नृत्य


सध्याच्या तांत्रिक युगात आपली कलात्मकता जोपासून त्यात करिअर करायचं असल्यास गरज असते ती तिव्र इच्छाशक्तीची. सातत्याने प्रयत्न, अॅकेडेमिक पातळीवर अभ्यास आणि रियाझ केला तर आपली कला किंवा आवड कायमस्वरुपी आपल्या आयुष्यात टिकवता येते. आत्मिक सुख देणारी कथ्थक ही अशीच एक कला. यात भाव-रस-राग-ताल, कथानक किंवा एखादा वर्तमान मुद्दा सादर करण्यासाठी नाटकाचा समावेश केला जातो. कल्पकता आणि नवनिर्मिती हा नृत्यकलेचा आत्मा आहे. नटराज हे या नृत्यशैलीचे दैवत मानले जाते.
नाट्य, नृत आणि नृत्य हे सुध्दा भरतनाट्यमचे तीन भाग आहेत.
नाट्य : नाट्याद्वारे कलाकार एखादी कथा सादर करतो.
नृत : यात तालाचा वापर केला जातो.
नृत्य : नाट्य व नृत याचे मिश्रण म्हणजे नृत्य.

नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सालसा किंवा हिप-हॉप या नृत्यशैली मानवाच्या ज्ञात इतिहासात उदयाला आल्या. परंतु भारतीय शास्त्रीय नृत्यशैली मात्र त्याही आधीच्या आहेत. देवी- देवता या शास्त्रीय शैलींमध्ये नृत्य करतात, असं आपल्याकडे मानतात. शास्त्रीय या शब्दाचा अर्थ – शास्त्राला धरून किंवा शास्त्रावर आधारित असं नृत्य. शास्त्रीय नृत्याला चौकट असते, बंधन असतं, नियम असतात. कोणत्याही शास्त्रीय नृत्याला एक विशिष्ट इतिहास आहे. त्याला अभिजात संगीताची जोड आहे. प्रत्येक नृत्यशैलीला एक अभिजात शैली म्हणून ओळख आहे.
कथक, भरतनाट्यम्‌, कुचीपुडी, ओडिसी, कथकली, मोहिनीअट्टम्‌, मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्याच्या विविध शैली आहेत. शास्त्रीय नृत्य हे मुख्यतः नृत्य आणि अभिनय या दोन खांबांवर आधारलेले आहे. उत्तम शरीरसौष्ठव, सौंदर्य, आकर्षक वेशभूषा, केशभूषा आणि रंगभूषा, रंगमंच सजावट, तालबद्ध संगीत काव्य रचना, उत्तम गायक-वादकांच्या संचाद्वारा सुमधुर संगीताची साथ व त्याचप्रमाणे मनाची शांतता आणि एकात्मता या सगळ्यांचा समन्वय म्हणजे शास्त्रीय नृत्य.
नृत्याचे साधन शरीर आहे, शरीराचे केंद्र मन आहे म्हणूनच मनाच्या शक्तीवर नृत्य अवलंबून असते त्यामुळे शास्त्रीय नृत्य ही एक साधना आहे.
शास्त्रीय नृत्याचे महत्व सांगणारा हा “अभिनय दर्पण” ग्रंथातील श्लोक.
यतो हस्तो ततो दृष्टीः। यतो दृष्टीस्ततो मनः।
यतो मनस्ततो भावः। यतो भावस्ततो रसः।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जिथे हात तिथे दृष्टी, जिथे दृष्टी तिथे मन, जिथे मन तिथे भाव आणि जिथे भाव तिथे रस.
हल्लीच्या काळात फिटनेस म्हणूनही नृत्यप्रकार शिकले जातात. पण ते तेवढ्यापुरतेच. शास्त्रीय नृत्यप्रकाराचा अध्यात्माशी फार मोठा संबंध आहे. त्यामुळे प्रचंड मेहनत, नृत्यसाधना आणि रियाझ यांमुळेच ही नृत्यशैली आत्मसात करणे शक्य आहे.
Share on Google Plus
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment